रत्नागिरी : नेवरे गावात सोमवारी सकाळी सव्वा आठच्या सुमारास तुटलेल्या विजेच्या तारेचा शॉक बसून रघुनाथ गुरव यांच्या दुभत्या गायीचा मृत्यू झाला. गुरव हे नेहमीप्रमाणे आपली जनावरे चरायला नेत असताना हा अपघात घडला.
गायीला बांधलेली दोरी त्यांचा मुलगा विनायक यांच्या हातात होती; मात्र सुदैवाने तो थोडक्यात बचावला. घटनेची माहिती मिळताच महावितरणचे कर्मचारी, तलाठी, सरपंच, पोलीस पाटील, पशुवैद्यकीय अधिकारी आणि पोलिस तातडीने घटनास्थळी पोहोचले. या घटनेमुळे ग्रामस्थांनी महावितरणच्या निष्काळजी कारभाराविरोधात तीव्र संताप व्यक्त केला.
रत्नागिरी नेवरेत तुटलेल्या विजेच्या तारेचा धक्का; दुभत्या गायीचा मृत्यू
