GRAMIN SEARCH BANNER

न्यू व्हिजन इंग्लिश मिडीयम स्कूल आंबेड, यांच्या वतीने संगमेश्वर पोलीस स्थानक येथे पोलिसांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे

Gramin Varta
10 Views

न्यू व्हिजन इंग्लिश मीडियम स्कूल आंबेडची गेली पाच वर्षाची परंपरा कायम….! रक्षाबंधनाचा पवित्र सण पोलिसांबरोबर केला साजरा

संगमेश्वर प्रतिनिधी: कोणताही सण – उत्सव असो आपल संरक्षण करणारे सीमेवरचे जवान, आरोग्य सेवक तसेच पोलीस दल या सर्वांना आपल्याप्रमाणे सण साजरे करताच येत नाहीत. याच अनुषंगाने त्यांच्या भावना जपत आज न्यू व्हिजन इंग्लिश मिडीयम स्कूल आंबेड बू मधील विद्यार्थिनींनी अतिशय उत्साहात पोलीसांना राखी बांधत रक्षाबंधन दिवस साजरा केला. हा बहिणी भावाचा पवित्र नात्याचा सण साजरा करत असताना लहान बहिणीने पोलिसांच्या हाताला राखी बांधत असताना येथील उपस्थित पोलिसांचे डोळे पाझरलेले पाहायला मिळाले.

दरम्यान पोलीस निरीक्षक राजाराम चव्हाण यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि विद्यार्थ्यांना पोलिस वापर करत असलेल्या वेगवेगळ्या शस्त्रांची ओळख पोलिसांनी करून दिली. पोलीस दिवस रात्र कोणत्या पद्धतीने काम करतात त्यांचे वेगवेगळे काम करण्याची पद्धत कशी असते या वेगवेगळ्या पद्धतीची माहिती पोलीस निरीक्षक राजाराम चव्हाण यांनी या विद्यार्थिनींना दिले. पोलीस आणि समाजातील ऋण संबंध जुळत जावेत यासाठी प्रत्येक व्यक्तीने पोलिसांना शत्रू नव्हे तर मित्र म्हणून बघावे त्याचे उत्तर उदाहरण न्यू विजन इंग्लिश मीडियम स्कूल आंबेड च्या विद्यार्थ्यांनी सांगड घालून  दिली असल्याचे प्रतिपादन यावेळेस पोलीस निरीक्षक राजाराम चव्हाण यांनी केले. विद्यार्थ्यांना पूर्ण पोलीस स्टेशनची माहिती या वेळेस देण्यात आली पोलिसांनी ज्या पद्धतीने या रक्षाबंधनाचा सण कुटुंबात राहून साजरा करत असल्याची जाणीव यावेळीस पोलीस मित्रांना झाली. या कार्यक्रमाची चर्चा अनेक ठिकाणी झाली न्यू व्हिजन इंग्लिश मीडियम स्कूल आंबेड चे वेगवेगळे उपक्रमाची पोलीस बांधवांनी कौतुक केले. समाज उपयोगी आणि सर्व जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन सामाजिक एकतेचे संदेश देणारे उपक्रम या शाळेमध्ये पुस्तका विहिरीत केले जातात त्याचा अभिमान पोलिसांना आहे असेही त्यांनी सांगितले.

यावेळी या कार्यक्रमाला संगमेश्वर चे पोलीस निरीक्षक राजाराम चव्हाण, संस्थेचे जेष्ठ सदस्य सलाउद्दीन बोट, सचिव राजेश आंबेकर, डॉक्टर सलीम सय्यद, शाळेच्या मुख्याध्यापिका नाझीमा बांगी, उप मुख्याध्यापिका सुजेन अलजी, विदिशा कांबळे, कौस्तुभ धनावडे, ऋषभ खंदारे, यांच्या समवेत विद्यार्थी विद्यार्थिनी पोलीस बांधव उपस्थित होते. सदरील कार्यक्रम संगमेश्वर पोलीस स्थानकाच्या हॉलमध्ये करण्यात आला.

Total Visitor Counter

2647849
Share This Article