लांजा : तालुक्यातील भटवाडी येथील एका ५६ वर्षीय इसमाचा कावीळ आणि तापाच्या आजाराने रत्नागिरी येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. दिलीप पांडुरंग पेंडुरकर असे या मृत व्यक्तीचे नाव आहे. १८ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत दिलीप पांडुरंग पेंडुरकर यांना जून २०२५ पासून कावीळ आणि तापाचा त्रास होता. त्यांच्यावर मुंबई येथेही उपचार सुरू होते. १६ ऑगस्ट रोजी त्यांना पुन्हा थंडी आणि ताप आल्याने लांजा येथील पत्की डॉक्टरांकडून त्यांनी उपचार घेतले. परंतु, त्रास कमी न झाल्याने आणि पाठ दुखू लागल्याने, त्यांचा मुलगा साईराज पेंडूरकर यांनी १७ ऑगस्ट रोजी दुपारी १२.३० वाजता त्यांना अधिक उपचारांसाठी रत्नागिरीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले.
सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच, १८ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेची माहिती साईराज यांनी पोलिसांना दिली. त्यानुसार, रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर आवश्यक कागदपत्रे लांजा पोलीस ठाण्यात पाठवण्यात आली आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे पेंडुरकर कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
लांजातील प्रौढाचा कावीळ, तापाने रत्नागिरीत मृत्यू
