सावर्डे : चिपळूण तालुक्यातील निकम फाउंडेशन संचालित निकम इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस तर्फे स्वातंत्र्य दिनाचा सोहळा उत्साहात पार पडला.
स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संस्थेचे डॉ. अमोल निकम, सुवासिनी निकम व आदिती निकम यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमानंतर सर्व रुग्ण, स्टाफ व विद्यार्थ्यांना भेटवस्तू व खाऊचे वाटप करण्यात आले.
या सोहळ्याला लायन्स क्लबचे डॉ. कृष्णकांत पाटील, संजय कोकाटे, राजेश कोकाटे, डॉ. अरुण पाटील, डॉ. दर्शना पाटील, निकम इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेसचे विद्यार्थी, निकम हॉस्पिटलचा सर्व स्टाफ, वरदा सावंत, डॉ. पूजा दाभोळकर, डॉ. नागमणी आणि विनायक सावंत उपस्थित होते.
निकम इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेसतर्फे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
