लांजा : तालुक्यात अवैधरित्या गावठी हातभट्टीची दारू बाळगल्याप्रकरणी एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई काल, २३ जून २०२५ रोजी सायंकाळी करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २३ जून २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजून १५ मिनिटांनी मौजे वेरवली बद्रक, गुरववाडीच्या विरुद्ध दिशेला आरोपी दीपक सीताराम डोळस (वय ५८, रा. चेरवली बद्रक, डोळसवाडी, ता. लांजा) याला अवैधरित्या दारू बाळगताना पकडले.
आरोपी दीपक डोळस याच्या ताब्यात गावठी हातभट्टीची दारू, विक्री करण्याच्या उद्देशाने, बिगरपरवाना स्थितीत मिळून आली. याप्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लांजात हातभट्टीची दारू जप्त, एकावर गुन्हा दाखल
