GRAMIN SEARCH BANNER

कफ सिरप विक्रीसाठी डॉक्टरांची चिठ्ठी आवश्यक, अन्न व औषध प्रशासनाचे विक्रेत्यांना निर्देश

Gramin Varta
184 Views

मुंबई: बालरुग्णांसाठी असलेल्या सर्व कफ सिरप या प्रवर्गातील औषधांची विक्री ही डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय करू नये, असे निर्देश अन्न व औषध प्रशासनाने राज्यातील सर्व किरकोळ औषध विक्रेते आणि त्यांच्या संघटना दिले आहेत.

मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये कफ सिरपमध्ये भेसळीमुळे झालेल्या बालमृत्यूंच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने हे निर्देश दिले आहेत.

आरोग्य व कुटुंबकल्याण विभागाचे निर्देश्व सूचना

बालरुग्णांसाठी असलेल्या सिरप या प्रवर्गातील औषधांची विक्री ही डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय करू नये.

औषधे व सौंदर्य प्रसाधने नियम १९४५ अंतर्गत अनुसूची एच, अनुसूची एच १ आणि अनुसूची एक्स या औषधांची विक्री डॉक्टरांच्या चिठ्ठीवरच केली जाईल, याची खात्री करावी.

डॉक्टरांच्या चिठ्ठीविना या औषधांची विक्री होत असल्याने या गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी नियमांचे पालन किरकोळ औषध विक्रेत्यांनी करावे

या औषधांची विक्री कोणी करत असेल, तर स्थानिक औषध नियंत्रण अधिकाऱ्यांना कळवावे. तसेच नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. – दा. रा. गहाणे, औषध नियंत्रक, अन्न व औषध प्रशासन विभाग

Total Visitor Counter

3214907
Share This Article