प्रशांत यादव यांच्या मार्गदर्शनाखाली दक्षिण रत्नागिरी जिल्ह्यात ठिकठिकाणी प्रशिक्षण;आजी-माजी पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
चिपळूण :भाजपच्या पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियानाला शनिवारपासून (ता. १४) रत्नागिरी दक्षिण जिल्ह्यात मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. भाजप प्रदेशाध्यक्ष, आमदार रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रात हे अभियान राबविले जात आहे. भाजपचे रत्नागिरी दक्षिण जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांच्या मार्गदर्शनाखाली दक्षिण जिल्ह्यात ठिकठिकाणी सुरू झालेल्या या महाअभियानात शेकडो कार्यकर्ते व पदाधिकारी सहभागी झाले आहेत. रत्नागिरी मध्य मंडल यांचे माभळे (ता. संगमेश्वर) येथे प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मध्य मंडल तालुकाध्यक्ष प्रतिक देसाई , संयोजक संकेत कदम, तालुका सरचिटणीस राजेश आंबेकर, महिला मोर्चा तालुकाध्यक्ष सुचिता नाचणकर, जिल्हा उपाध्यक्ष बावा नाचणकर, संदिप सुर्वे आणि जिल्हा सरचिटणीस ओंकार फडके यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
रत्नागिरी शहर मंडलच्यावतीने सुरू असलेल्या प्रशिक्षणाला जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव आणि जिल्हा सरचिटणीस ओंकार फडके यांनी भेट दिली. यावेळी शहराध्यक्ष दादा ढेकणे, संयोजक सौ. मुक्ता बाष्टे, सरचिटणीस बाबू सुर्वे, निलेश आखाडे, बाबासाहेब परूळेकर यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी तिथे मांडण्यात आलेल्या प्रदर्शनीला देखील जिल्हाध्यक्षांनी भेट दिली. या अभियानातील पहिल्या भागात सात मंडलांनी तसेच पुढील भागात पाच मंडल प्रशिक्षण वर्ग घेणार असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, चिपळूण येथे बाळासाहेब माटे सभागृहात रत्नागिरी दक्षिणचे जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव आणि रत्नागिरी उत्तरचे जिल्हाध्यक्ष सतीश मोरे यांच्या उपस्थितीत महाअभियानाचे उद्घाटन झाले. यावेळी जिल्हा सरचिटणीस स्वानंद रानडे, जिल्हा सरचिटणीस सुप्रिया उतेकर, महाअभियानचे जिल्हा संयोजक आशिष खातू, चिपळूण ग्रामीण मंडलचे अध्यक्ष विनोद भुरण, जिल्हा परिषदेच्या सदस्य रावी मोरे, चिपळूण शहर मंडल अध्यक्ष शशिकांत मोदी, अल्पसंख्याक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष लियाकत शाह व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव आणि सतीश मोरे यांनी मार्गदर्शन केले. या प्रशिक्षण महाअभियानात भाजपचे आजी-माजी पदाधिकारी, नगरसेवक, नगरसेविका व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.






