GRAMIN SEARCH BANNER

मंडणगडमध्ये मद्यप्राशन करून गोंधळ; दोघांवर गुन्हा दाखल

Gramin Varta
23 Views

मंडणगड : शहरातील एका चौकात मद्यधुंद अवस्थेत आढळलेल्या दोन व्यक्तींवर मंडणगड पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.

संदीप चांदे (४५, मूळ गाव कादवली–दापोली, सध्या जांभुळनगर) आणि परसल असरफी हरिजन (५२, मूळ उत्तर प्रदेश, सध्या साईनगर, मंडणगड) अशी या दोघांची नावे आहेत. रात्री ८ वाजण्याच्या सुमारास गस्तीवर असताना पोलिसांना ते दोघेही सार्वजनिक ठिकाणी मद्यधुंद अवस्थेत दिसून आले.

या संबंधीची फिर्याद पोलीस शिपाई विनय पाटील यांनी नोंदवली असून, पुढील तपास सुरू आहे.

Total Visitor Counter

3366866
Share This Article