GRAMIN SEARCH BANNER

निष्ठावान युवक जिल्हाध्यक्ष नौसीन काझी यांची प्रभाग क्रमांक ४ मध्ये जोरदार चर्चा!

Gramin Varta
110 Views

कोकण नगर, किर्ती नगर, क्रांतीनगरसह अन्य भागातून नौसीन काझींना जोरदार समर्थन; निष्ठा व जनसंपर्कामुळे विरोधकांना आव्हान

रत्नागिरी: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवक जिल्हाध्यक्ष नौसीन काझी यांच्या नावाची चर्चा प्रभाग क्रमांक ४ मध्ये सध्या जोरदार आहे. या प्रभागात येणाऱ्या कोकण नगर, किर्ती नगर, क्रांतीनगर, स्टेट बँक कॉलनी, नगरपरिषद कर्मचारी वसाहत, आणि चरमले या विस्तृत भागातील जनसामान्यांमध्ये काझी यांच्या कार्याची आणि दांडग्या जनसंपर्काची मोठी दखल घेतली जात आहे.

या प्रभागाचे माजी नगरसेवक मुसा काझी यांनी  शिवसेनेत प्रवेश केला आणि आता ते भाजपसोबत युती असणाऱ्या शिवसेना (शिंदे) पक्षात सक्रिय आहेत. या पार्श्वभूमीवर, गेली पाच वर्षे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची धुरा अत्यंत प्रामाणिकपणे आणि निष्ठेने सांभाळण्याचे काम युवक जिल्हाध्यक्ष नौसीन काझी यांनी केले आहे.

नौसीन काझी हे त्यांच्या कोकण नगर येथील जनसंपर्क कार्यालयामार्फत सातत्याने जनहिताची कामे करत आहेत. भागातील नागरिकांच्या समस्या, विशेषत: पाणी, लाईट, गटार आणि रस्ते या मूलभूत गरजांबाबत ते वारंवार नगरपालिकेत जाऊन संबंधित अधिकाऱ्यांवर जाब विचारून आवाज उठवताना दिसतात. केवळ स्थानिक समस्याच नव्हे, तर रेशन कार्ड, आधार कार्ड यांसारखी सेतू संबंधित कामे तसेच वैद्यकीय आणि शासकीय योजनांची कामेही ते नागरिकांसाठी करत असतात.

मतदार म्हणून नागरिकांच्या महत्त्वाच्या गरजा लक्षात घेऊन इलेक्शन कार्ड (मतदान ओळखपत्र) नवीन बनवणे, नावामध्ये दुरुस्ती करणे, पत्ता बदलणे या संदर्भातील लोकांची अडीअडचणीची कामे ते पूर्णपणे निशुल्कपणे करत आले आहेत. याच जनसंपर्काचे आणि निःस्वार्थ कामाचे परिणाम लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत दिसून आले. आघाडीच्या उमेदवारासाठी नौसीन काझी यांनी महत्त्वाची भूमिका बजावत प्रभाग क्रमांक ४ मधून बहुमूल्य आघाडी (लीड) मिळवून देण्यास मोठा हातभार लावला होता.

केलेल्या आणि सध्या सुरू असलेल्या कामांवरून नौसीन काझी यांचा त्यांच्या प्रभागातील स्थानिकांमध्ये अत्यंत दांडगा वैयक्तिक संपर्क आहे हे स्पष्ट होते. त्यांच्या कामाप्रतीची निष्ठा, पक्षाप्रतीची बांधिलकी आणि थेट नागरिकांशी असलेला संपर्क ही त्यांची सर्वात मोठी जमेची बाजू आहे. त्यामुळे, त्यांच्या विरोधात असणाऱ्या उमेदवाराला ही आगामी निवडणूक कठीण जाणार असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. काझी यांच्या कार्यामुळे प्रभाग क्रमांक ४ मधील निवडणुकीच्या राजकारणाला एक वेगळी दिशा मिळण्याची चिन्हे आहेत.

Total Visitor Counter

3369674
Share This Article