देवरुख:- संघटनेचे धोरण व भूमिका या विरोधात कार्य केल्याने गाव विकास समिती, रत्नागिरी जिल्हा संघटनेचे जिल्हा संघटक मनोज घुग यांची गाव विकास समिती संघटनेतून हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती सरचिटणीस सुरेंद्र काबदुले यांनी दिली आहे.
गाव विकास समितीचे अध्यक्ष उदय गोताड व संघटन प्रमुख सुहास खंडागळे यांच्या सूचनेनुसार ही कारवाई करण्यात आल्याचे काबदुले यांनी सांगितले. मनोज घुग हे मागील काही महिन्यांपासून संघटनेचे धोरण व भूमिका या विरोधात भूमिका घेत असल्याने त्यांना संघटनेतून काढून टाकण्यात आले असल्याचे सुरेंद्र काबदुले यांनी म्हटले आहे.