दापोली : तालुक्यातील शिवसेना नेते नीलेश शेठ यांनी ‘महावितरण’ला निर्वाणीचा इशारा देऊनही ३२ गावांत दरदिवशी सातत्याने वीजप्रवाह खंडित होत असल्याने संताप व्यक्त होत आहे.
देगाव उपकेंद्रातून परिसराला वीजपुरवठा केला जातो. पाऊस सुरू झाल्यापासून दरदिवशी दिवसातून १५ ते २० वेळा वीजप्रवाह खंडित होत आहे. रात्रीही दरदिवशी वीजप्रवाह खंडित होत आहे. अधिकारी सतत ३३ केव्ही वाहिनी नादुरुस्त असल्याचे सांगत आहेत. मात्र महिनाभरापेक्षा अधिक कालावधी होऊनही ‘महावितरण’ला बिघाड सापडत नसल्याबद्दल संताप व्यक्त केला जात आहे. दर अर्धा-एक तासाने वीजप्रवाह खंडित होत असल्याने विजेवर अवलंबून असणाऱ्या व्यवसायांना खूप नुकसान सहन करावे लागत आहे. नीलेश शेठ यांनी ‘महावितरण’ला १० दिवसांची मुदत दिली होती.
दापोलीतील ३२ गावात विजेचा खेळखंडोबा सुरूच

Leave a Comment