GRAMIN SEARCH BANNER

न्यू व्हिजन इंग्लिश मीडियम स्कूल आंबेड बू.शाळेत नवागतांचे उत्साहात स्वागत!

Gramin Search
13 Views

विद्यार्थ्यांचे वाजत गाजत करण्यात आले स्वागत

संगमेश्वर : शाळेच्या पहिल्या दिवशी शाळेत नव्याने येणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी शाळेतीलसंस्थेचे सदस्य,शिक्षक,पालक, विद्यार्थी  सज्ज झाले होते. नव्याने शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेची आवड लागावी म्हणून त्यांचे जंगी स्वागत करण्यासाठी फुले, फुगे, रांगोळी रेखाटून सजावट करण्यात विद्यार्थ्यांनी हातभार लावला. तसेच जंगी स्वागत नवनिर्मिती फाउंडेशन संचलित न्यू व्हीजन इंग्लिश मीडियम स्कूल आंबेडच्या विद्यार्थ्यांचे करण्यात आले.

शाळेचा पहिला दिवस कायम स्मरणात रहावा यासाठी नवागतांची वाजत गाजत मिरवणूक काढली. शाळेत प्रवेश करताना त्यांच्या पावलांचे ठसे कागदावर उमटवले. त्यांना गोड खाऊ, फुले, फुगे देऊन स्वागत करण्यात आले. नवागातांच्या हस्ते त्यांच्या वर्गाची फीत कापून उद्घाटन करण्यात आले

यावेळी संस्थेचे अध्यक्ष रमजान गोलंदाज, सचिव राजेश आंबेकर, ज्येष्ठ सदस्य वासू काका लिंगायत ,सलाउद्दीन बोट, मुख्याध्यापिका नाझीमा बांगी सुजेन अलजी, यांनी नवागतांना
पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन स्वागत केले.

नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत करीत नवीन विद्यार्थ्यांचे चेहरे आनंदमय होते. आपल्या भविष्याच्या करिअरसाठी उचललेले पाऊल हे जीवनाला आकार उकार देईल असा विश्वास यावेळी पालकांनी व्यक्त केला. यावेळेस विद्यार्थ्यांन समवेत नवीन पालक सुद्धा उपस्थित होते त्याचप्रमाणे संस्थेची सदस्य शिक्षण समितीचे सदस्य व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळेस अकलीमा परदेशी, ऋषभ खंदारे, अलिशा पाटणकर, असिफा मालगुडकर, कौस्तुभ धनावडे, विदिशा कांबळे, समीक्षा फेपडे, कुरसिया मोडक या शिक्षणकासहित स्कूलच्या विद्यार्थ्यांनी नवीन मुलांवरती फुले उडवून त्यांचे स्वागत केले.

Total Visitor Counter

2648428
Share This Article