रत्नागिरी : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीची नुकतीच जाहीर झालेली जंबो कार्यकारिणी रत्नागिरी जिल्ह्यासाठी महत्त्वाची ठरली आहे. यात रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक महत्त्वाच्या नेत्यांना प्रमुख पदे देऊन जिल्ह्याचं महत्त्व अधोरेखित करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे, यंदा प्रथमच रत्नागिरी जिल्ह्याला दोन जिल्हाध्यक्ष मिळाले आहेत.
ॲड. हुस्नबानू खलिफे यांची प्रदेश सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली आहे, तर माजी जिल्हाध्यक्ष रमेश कीर यांनाही प्रदेश सरचिटणीस पदाची जबाबदारी मिळाली आहे.
जिल्हाध्यक्ष पदांवर झालेल्या नियुक्त्यांमध्ये यंदा एक नवा पायंडा पडला आहे. नुरुद्दीन सय्यद यांची दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली आहे, तर सोनललक्ष्मी घाग उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यभार सांभाळतील. यामुळे जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे.
या नियुक्त्यांमुळे रत्नागिरी जिल्ह्यात काँग्रेस पक्ष अधिक मजबूत होईल आणि आगामी काळात पक्षाच्या कामाला गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.