GRAMIN SEARCH BANNER

नाचणे रसाळवाडीतील इमारतीच्या पार्किंगमधून दुचाकी चोरी

Gramin Varta
185 Views

रत्नागिरी : शहरालगतच्या नाचणे येथील रसाळवाडी परिसरात एका रहिवासी इमारतीच्या पार्किंगमधून दुचाकी चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. ही चोरी २८ डिसेंबर २०२५ ते ३ जानेवारी २०२६ या कालावधीत घडली असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या प्रकरणी अमर अनंत म्हस्के (रा. रसाळवाडी, नाचणे, रत्नागिरी) यांनी रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, म्हस्के यांनी त्यांची एमएच ०८ एएफ १२०० क्रमांकाची दुचाकी ते राहत असलेल्या इमारतीच्या पार्किंगमध्ये उभी करून ठेवली होती.
मात्र काही दिवसांनी दुचाकी पार्किंगमध्ये आढळून न आल्याने त्यांनी शोध घेतला. शोध घेऊनही दुचाकी न सापडल्याने अखेर शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शहर पोलीस करत आहेत.

Total Visitor Counter

3368328
Share This Article