रत्नागिरी : शहरातील धनजीनाका व शहरालगतच्या खेडशी चाँदसुर्या पॉईंट येथे अवैधरित्या दारु बाळगणाऱ्या संशयितावर पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला. सचिन सुरेश गुरव (50, ऱा झारणीरोड रत्नागिरी), महेश रमेश चव्हाण (45, ऱा कारवांचीवाडी रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत़.
शहर पोलिसांनी केलेल्या कारवाईत शहरातील धनजीनाका येथे सचिन गुरव याच्या ताब्यात पोलिसांना 19 लिटर गावठी दारु आढळून आल़ी 6 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी ही कारवाई केल़ी तर शहरालगतच्या चाँदसुर्या येथे ग्रामीण पोलिसांनी केलेल्या कारवाईत महेश चव्हाण याच्या ताब्यात पोलिसांना देशी व विदेशी मद्याच्या बाटल्या आढळून आल्या. ज्यांची किमंत 3 हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले आह़े. दोन्ही संशयितांविरुद्ध पोलिसांनी महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम 65 ई नुसार गुन्हा दाखल केला.
रत्नागिरीत अवैध दारु बाळगल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा
