जाकादेवी/संतोष पवार : रत्नागिरी तालुक्यातील मोहिनी मुरारी शिक्षण संस्था मालगुंड संचलित ,मोहिनी मुरारी मयेकर कला वाणिज्य महाविद्यालय चाफे येथे मयेकर महाविद्यालयाच्या १६ व्या वर्धापन दिनानिमित्त रक्तदान शिबीर व आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले.
महाविद्यालयामध्ये कार्यरत असलेल्या ‘राष्ट्रीय सेवा योजना विभाग’ आणि ‘आजीवन अध्ययन व विस्तार विभाग ‘यांच्यातर्फे या शिबीराचे आयोजन करण्यात आले होते .या शिबीरामध्ये जिल्हा शासकीय रुग्णालय रत्नागिरी ,यांच्या संपूर्ण टीमने हे शिबीर चाफे महाविद्यालयात यशस्वी केले.रक्तदान करणे या मागचा हेतू हाच आहे की समाजात असंख्य अशा गरजू व्यक्ती असतात ,त्यांना रक्ताची गरज असते ,आणि म्हणूनच गरजवंताना जीवनदान देण्याकरिता महाविद्यालय रक्तदान शिबीराचे सामाजिक उपक्राचे आयोजन करण्यात आले.
रक्तदान शिबिरामध्ये महाविद्यालयाचे विद्यार्थी ,प्राध्यापक, तसेच परिसरातील रक्तदाते ,महाविद्यालयाचे माजी विद्यार्थीही सहभागी झाले होते. सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून मयेकर महाविद्यालयाच्या १६ व्या वर्धापनदिनानिमित्त एकूण १६ रक्तदात्यांनी या शिबीरात रक्तदान केले.
सदरचे शिबीर शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष व युवा नेते श्री रोहित मयेकर ,संस्थेचे संचालक श्री.सुरेंद्र माचिवले ,महाविद्यालयाच्या प्राचार्या स्नेहा पालये यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले.