राजापूर : फणसे पेट्रोलपंप कुवेशी येथील कोणीचा टेम या ठिकाणी जंगलमय झाडाझुडपातील चारोळीच्या झाडाला नायलॉनच्या रस्सीने गळफास लावून विघ्नेश संतोष कुवेसकर (वय 26, रा. कुवेशी, तेलीवाडी, ता. राजापूर, जि. रत्नागिरी) या तरुणाने आत्महत्या केली. ही घटना 26 जून 2025 रोजी दुपारी 2.00 वाजेच्या सुमारास घडली असून, 26 जून 2025 रोजी सायंकाळी 7.33 वाजता आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. आत्महत्येचे कारण अज्ञात आहे.
राजापूरमध्ये 26 वर्षीय तरुणाची आत्महत्या
