सावर्डे बसस्टॉपची दुरवस्था; वर्ष उलटले तरी नुकसानग्रस्त शेड व स्ट्रीट लाईटची दुरुस्ती नाही

Gramin Varta
113 Views

सावर्डे, (विनायक सावंत): चिपळूण तालुक्यातील मुंबई-गोवा महामार्गावरील महत्त्वाचे सावर्डे बसस्टॉप परिसरात सुमारे वर्षभरापूर्वी झालेल्या लक्झरी बसच्या भीषण अपघातात बसथांबा शेड, स्ट्रीट लाईटचा पोल आणि परिसरातील इतर संरचनांचे मोठे नुकसान झाले होते. मात्र, अपघाताला एक वर्षाहून अधिक कालावधी उलटूनही नुकसानग्रस्त शेड व पोलची दुरुस्ती करण्यात आलेली नसल्याने नागरिक आणि प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

अपघातात बसथांब्याचे लोखंडी पत्रे वाकून धोकादायक अवस्थेत लोंबकळत आहेत. अनेक ठिकाणी गंजलेले लोखंड बाहेर आले असून पादचारी व प्रवाशांच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे. बसस्टॉप परिसरातील स्ट्रीट लाईटचा पोलही अद्याप उभारण्यात आलेला नसल्याने रात्रीच्या वेळी अंधाराचे साम्राज्य पसरते. त्यामुळे नागरिकांना तसेच प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
सावर्डे ही परिसरातील अनेक गावांची प्रमुख बाजारपेठ असून दररोज शेकडो नागरिक, विद्यार्थी आणि प्रवासी या बसथांब्याचा वापर करतात. अशा ठिकाणी मोडकळीस आलेली संरचना कायम असल्याने अपघाताची भीती व्यक्त केली जात आहे.
स्थानिक नागरिकांनी संबंधित विभागाने तातडीने नुकसानग्रस्त शेड हटवून नवीन बसथांबा उभारावा, तसेच स्ट्रीट लाईट व्यवस्था पूर्ववत करावी अशी मागणी केली आहे. अन्यथा एखादी दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी संबंधित प्रशासनावर राहील, असा इशाराही नागरिकांनी दिला आहे.

Total Visitors :
4595416
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *