मुंबई-गोवा महामार्गावरील वांद्रीत भीषण अपघात; कार आणि मासे वाहतूक करणाऱ्या बोलेरो पिकअपची जोरदार धडक

Gramin Varta
354 Views

संगमेश्वर : मुंबई-गोवा महामार्गावरील वांद्री स्टॉपनजीक नवीन पुलाच्या मागील बाजूस शनिवारी १२ सप्टेंबर रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास कार आणि मासे वाहतूक करणाऱ्या बोलेरो पिकअपमध्ये भीषण अपघात झाला. दोन्ही वाहनांमध्ये जोरदार धडक झाल्याने वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सुदैवाने या भीषण अपघातात कोणतीही मनुष्यहानी झाली नाही.

अपघातानंतर दोन्ही वाहने महामार्गावरच असल्याने वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला. दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. अपघातामुळे काही काळ वाहनचालकांना मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला.

Total Visitors :
4841883
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *