पोलीस निरीक्षक नितीश केणी यांचा सुलतान हाफसानी यांच्याकडून सत्कार

Gramin Varta
134 Views

संगमेश्वर / नियाज खान : संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीश केणी यांची सामाजिक कार्यकर्ते तथा साप्ताहिक ‘पोलीस तपास वार्तापत्र’चे रत्नागिरी जिल्हा प्रतिनिधी सुलतान हुसेन हाफसानी यांनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी हाफसानी यांनी पोलीस निरीक्षक केणी यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

सोनगिरी आंबेड येथील सामाजिक कार्यकर्ते म्हणून कार्यरत असलेले सुलतान हाफसानी यांची नुकतीच साप्ताहिक ‘पोलीस तपास वार्तापत्र’च्या रत्नागिरी जिल्हा प्रतिनिधीपदी निवड झाली आहे. या निवडीबद्दल पोलीस निरीक्षक नितीश केणी यांनी हाफसानी यांचे गुलाबपुष्प देऊन अभिनंदन केले तसेच त्यांच्या आगामी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी नावडी येथील सामाजिक कार्यकर्ते तथा ‘पोलीस तपास’चे उपसंपादक दिनेश हरिभाऊ अंब्रे आणि संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल किशोर जोशी उपस्थित होते.

दरम्यान, श्रीकृष्ण जयंती आणि दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर संगमेश्वर तालुक्यात पोलिसांकडून विशेष खबरदारी घेण्यात आली होती. उत्सवादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याची माहिती पोलीस निरीक्षक नितीश केणी यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना दिली. सण-उत्सव शांततेत पार पडल्याबद्दल त्यांनी नागरिकांचे तसेच पोलिसांना सहकार्य करणाऱ्या सर्व घटकांचे आभार मानले.

Total Visitors :
4819964
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *