संगमेश्वर : संगमेश्वर तालुक्यातील कसबा जिल्हा परिषद गटातील महिलांसह ६५ वर्षे व त्यावरील पुरुष तसेच ७५ वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना एस.टी. प्रवासातील सवलतीचा लाभ मिळवून देण्यासाठी छावा सामाजिक संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या एनसीएमटी (NCMT) कार्ड नोंदणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिराच्या माध्यमातून विविध गावांतील एकूण ३७४ महिला व ज्येष्ठ नागरिकांची एनसीएमटी कार्डसाठी नोंदणी करण्यात आली.
कसबा, पारकरवाडा तसेच परिसरातील नागरिकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या शिबिरात तब्बल १५० नागरिकांनी सहभाग घेतला. कळंबस्ते येथे १२०, कळंबस्ते-भिमनभर येथे १४, तर नायरी येथे १०० नागरिकांनी एनसीएमटी कार्डसाठी नोंदणी केली. ग्रामीण भागातील महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना एस.टी. प्रवासातील सवलतीचा लाभ सहजपणे मिळावा, या उद्देशाने आयोजित केलेल्या या उपक्रमामुळे नागरिकांची मोठी सोय झाली.
शिबिराच्या माध्यमातून लाभार्थ्यांना एनसीएमटी कार्ड नोंदणीची प्रक्रिया एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्याने नागरिकांकडून छावा सामाजिक संघटनेच्या या उपक्रमाचे कौतुक करण्यात आले. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना प्रवास सवलतीचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रक्रियेसाठी मार्गदर्शन मिळाल्याने त्यांचा वेळ आणि श्रम वाचले.
हे शिबिर यशस्वी करण्यासाठी छावा सामाजिक संघटनेचे वहाब दळवी, मधुकर आंब्रे, श्रीकांत कांबळी, नियाज खान, असलम खान, नदीम साखरकर, आजरा खान, संतोष नरळकर, दत्ताराम वासकर, मिलिंद मोहिते, निखील भुवड, प्रथमेश देबनाथ, संदीप कदम, ऋषिकेश भास्कर, अक्षय नरळकर, केतन नांदस्कर, ओमकार वासकर, रूपेश वासकर, अर्णव कांबळी, गीता नरळकर, मनस्वी कांबळी, श्रावणी देबनाथ यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. नागरिकांना आवश्यक मार्गदर्शन व सहकार्य उपलब्ध करून देत शिबिर यशस्वी करण्यासाठी सर्वांनी मोलाचे योगदान दिले.
कसबा जिल्हा परिषद गटात छावा सामाजिक संघटनेच्या एनसीएमटी कार्ड नोंदणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ३७४ लाभार्थ्यांची नोंदणी
Leave a Comment






