ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद;सायबर तज्ञ अक्षय फाटक यांचे मार्गदर्शन
संगमेश्वर : सध्या समाजासमोर सायबर फ्रॉड आणि त्यामुळे ग्राहकांचे होणारे आर्थिक, मानसिक तसेच सामाजिक नुकसान हा अतिशय ज्वलंत प्रश्न निर्माण झालेला आहे. या विषयावर जनजागृती व्यावी या उद्देशाने ग्राहक मेळावा नुकताच संगमेश्वर येथील माभळे भिडे वाडी येथील इंद्रधनू हॉल येथे संपन्न झाला. सदर मेळावा संगमेश्वर व्यापारी संघटना आणि संगमेश्वर शाखा यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता.
ग्राहक मेळाव्याच्या सुरवातीस प्रमुख वक्ते डॉ. अक्षय फाटक (सायबर तज्ञ), प्रमोद भिंगार्डे (संगमेश्वर व्यापारी संघटना – अध्यक्ष) मनोहर भिडे (माजी संचालक) यांच्या शुभ हस्ते भारत मातेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले.
सदर मेळाव्याचे सूत्र संचालन व परिचय शाखेतील कनिष्ठ अधिकारी प्रकाश केळकर यांनी केले. मेळाव्यासाठी उपस्थित असलेले बँकेचे सभासद, ग्राहक हितचिंतक व अन्य मान्यवर व्यक्तीचे स्वागत करण्यात आले. प्रास्ताविक शाखा व्यवस्थापक विश्वास आठवले यांनी केले.
प्रास्ताविकामध्ये सायबर फ्रॉड पासून होणारे धोके काय आहेत व त्याची खबरदारी कशी घ्यावी, तसेच याबाबत जनजागृती व्यावी या उद्देशाने सदर मेळावा आयोजित करण्यात आल्याचे सांगण्यात आले. बँकेची असलेली सद्यस्थिती (ठेवी, कर्ज व अन्य व्यवसाय) या बाबत सर्व मान्यवरांना माहिती देण्यात आली. सदर मेळावा हा संगमेश्वर व्यापारी संघटना व जनता बँक संगमेश्वर शाखा यांच्या सयुक्त विद्यमानाने आयोजित करण्यात आला आहे असे आठवले यांनी सांगितले.
प्रमुख वक्ते डॉ. अक्षय फाटक यांनी सायबर फ्रॉड संबधी अधिक तपशीलवार माहिती दिली. त्यातील महत्वाचे मुद्दे पुढील प्रमाणे – आजच्या डिजीटल युगात बैंकिंग व्यवहार अधिक सुलभ व जलद व्हावेत यासाठी उपलब्ध असलेल्या मोबाईल बँकिंग, इंटरनेट बँकिंग, यू पी आय , ए टी एम , डेबिट कार्ड याचा वापर करताना कोणांलाही पासवर्ड, पिन ओ टी पी . व अन्य गोपनीय माहिती देऊ नये तसेच व्यवहार करताना कोणती काळजी घ्यावी हे नेमकेपणाने सांगितले. अनोळखी फोन व संदेश आल्यासस योग्य ती खात्री करावी, तसेच सोशल मिडीया सगळे वापरतात पण त्याची काळजी आणि जागरूकता असणे गरजेचे आहे. पासवर्ड वेळोवेळी बदलणे आवश्यक आहे. गुगल पे, फोन पे अश्या प्रकारची अँप्स योग्य पद्धतीने वापरणे शिकले पाहिजे. सोशल मीडियावर आपण जे फोटो अपलोड करतो त्याचा गैरवापर कसा होतो त्याची काळजी काय घ्यावी याबाबत तपशीलवार माहिती देण्यात आली.
आपण सोशल मिडियावर प्रदर्शित केलेल्या स्वतःच्या माहितीचा तसेच फोटोंचा गैरवापर कसा केला जातो. तसेच ऑनलाईन गेम मुळे आणि अयोग्य वेळी मुलाना फोन, गुगल पे, अन्य अँप्लिकेशन्स उपलब्ध करून दिल्याने कशा प्रकारे अपहार होऊ शकतात याची अनेक उदाहरणे दिली. स्वतःसोबतच आपल्या पुढच्या पिढीला याबाबतचे शिक्षण देऊन जागरूक करणे आवश्यक आहे असे आवाहन फाटक यांनी केले.
आर्थिक फ्रॉड झाल्यास काय करावे, तक्रार कुठे व कशा प्रकारे नोंद करावी या बाबत माहिती दिली. फ्रॉड झाल्यानंतर त्वरीत तक्रार देणे किती आवश्यक आहे हे उदाहरण देऊन सांगण्यात आले. तक्रार करण्यासाठी टोल फ्री नंबर, सायबर क्राईमची अधिकृत वेब साईट याबाबत माहिती दिली.अखेरीस अनंत शिगवण यांनी उपस्थित सर्व ग्राहकांचे, मान्यवरांचे तसेच हा मेळावा यशस्वी करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी मोलाचे सहकार्य केले त्या सर्वांचे आभार मानले व सर्व ग्राहकांना अल्पोपहार व चहापान होऊन मेळाव्याची सांगता झाली.
जनता सहकारी बँक लि, पुणे शाखा संगमेश्वर तर्फे ग्राहक मेळावा संपन्न
Leave a Comment




