दाभोळे: दाभोळे येथे बोलेरो चारचाकी वाहन उलटून झालेल्या अपघातात चालक किरकोळ जखमी झाल्याची घटना शनिवारी (ता. २२) पहाटे घडली.
दाभोळे येथून लांजाच्या दिशेने जात असताना चालकाला रस्त्यावरील वळणाचा अंदाज न आल्याने वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यानंतर चारचाकी खाली असलेल्या खड्ड्यामध्ये जोरदार आपटली . वेग खूप असल्याने वाहनाचा वरचा भाग तुटून वेगळा झाल्याचे दिसून येत आहे.
या अपघातात चालक जखमी झाल्याचे समजते. मात्र, रात्री उशिरापर्यंत या अपघाताची पोलीस ठाण्यात नोंद झालेली नसल्याने अधिकृत माहिती मिळू शकली नाही. तसेच जखमी चालकाचे नाव समजू शकलेले नाही.
दाभोळ्यात नवीन उड्डाणपुलाशेजारी चारचाकी उलटून चालक जखमी
Leave a Comment






