चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गावर कामथे येथे शनिवारी (१६ ऑगस्ट) दुपारी भरधाव कारचा भीषण अपघात झाला. अपघाताची तीव्रता पाहता अंगावर काटा उभा राहील, इतका जबरदस्त धक्का बसला होता. मात्र सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, कार मुंबईहून गोव्याच्या दिशेने वेगाने जात होती. कामथे येथे पोहोचताच चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि कार थेट दुभाजकावर जाऊन आदळली. याचवेळी बाजूने जात असलेल्या ट्रेलरलाही कारची धडक बसली. त्यामुळे कार दुभाजकावरच अडकून राहिली. अपघातात चालक थोडक्यात बचावला असून गंभीर अनर्थ टळला आहे.
मुंबई-गोवा महामार्गावर कामथे येथे कारला भीषण अपघात; सुदैवाने जीवितहानी टळली
