GRAMIN SEARCH BANNER

जयस्तंभ स्टेट बँकशेजारी संकुलातील दोन फ्लॅट चोरट्यांनी फोडले

Gramin Varta
27 Views

रत्नागिरी:- रत्नागिरीत शहराच्या मध्यवर्ती भागात चोरट्यांनी पुन्हा डोके वर काढले आहे. जयस्तंभ ते स्टेट बँक मार्गावर असणाऱ्या एका संकुलातील दोन फ्लॅट चोरट्यांनी फोडले. गुरुवारी दुपारी ही घटना उघडकीला आल्याने शहरात एकच खळबळ उडाली.

रत्नागिरी शहरात गुरुवार दुपारी भरवस्तीत जयस्तंभ परिसरात दोन फ्लॅट चोरट्यांनी फोडले आहेत. रत्नागिरी जयस्तंभ मार्ग हा वर्दळीचा परिसर आहे. याच रहदारीच्या परिसरात चोरट्यांनी दोन फ्लॅट फोडल्याने शहरात खळबळ उडाली आहे. चोरीची घटना माहिती होताच शहर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांकडून पंचनामा करण्याचे काम सुरू होते. मात्र, भरदिवसा चोरट्यांनी दोन फ्लॅट फोडल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे आहे .

Total Visitor Counter

3202558
Share This Article