GRAMIN SEARCH BANNER

सह्याद्री शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी आमदार शेखर निकम; अनिरुद्ध निकम यांची कार्याध्यक्षपदी निवड

Gramin Varta
117 Views

सावर्डे (प्रतिनिधी): कोकणातील शैक्षणिक क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या सावर्डे येथील नामांकित सह्याद्री शिक्षण संस्थेची ६८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा २२ मार्च २०२६ रोजी खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. या सभेत संस्थेच्या नवीन विश्वस्त मंडळाची पुढील पाच वर्षांसाठी एकमताने निवड करण्यात आली असून, चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शेखर गोविंदराव निकम यांची अध्यक्षपदी पुनर्निवड करण्यात आली आहे. गेल्या ६८ वर्षांपासून निवडणुका बिनविरोध करण्याची आपली गौरवशाली परंपरा संस्थेने याही वर्षी अत्यंत अभिमानाने कायम राखली आहे.

या महत्वपूर्ण सभेत उपाध्यक्षपदी इसाक महंमद खतीब, युगंधरा प्रकाश राजेशिर्के आणि प्रशांत गोविंदराव निकम यांची निवड करण्यात आली. विश्वस्त मंडळामध्ये मारुती आत्माराम घाग, चंद्रकांत भाऊराव सुर्वे, शांताराम परशुराम खानविलकर, महेश मनोहर महाडिक, मानसिंग श्रीराम महाडिक आणि आकांक्षा बाळकृष्ण पवार यांची फेरनिवड झाली आहे. तसेच गुलाब नारायण सुर्वे, अनिरुद्ध शेखर निकम आणि हरिश्चंद्र उर्फ बाबू सुर्वे यांची नवीन विश्वस्त म्हणून मंडळावर वर्णी लागली आहे. वार्षिक सभेनंतर २३ मार्च रोजी झालेल्या विश्वस्त मंडळाच्या विशेष बैठकीत युवा नेतृत्व अनिरुद्ध शेखर निकम यांची कार्याध्यक्षपदी, तर महेश मनोहर महाडिक यांची सेक्रेटरीपदी निवड करून संस्थेच्या कामकाजाची पुढील धुरा सोपवण्यात आली आहे.

सह्याद्री शिक्षण संस्थेची स्थापना १९५७ मध्ये संस्थापक दिवंगत गोविंदराव सावजी निकम यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी केली होती. गेल्या ६९ वर्षांपासून ही संस्था शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत असून, हजारो विद्यार्थी या संस्थेच्या माध्यमातून घडले आहेत. वैयक्तिक मतभेद बाजूला ठेवून केवळ संस्थेच्या हितासाठी एकत्रित काम करण्याच्या संस्थापक निकम यांच्या विचारांमुळेच आजच्या स्पर्धात्मक युगातही ही संस्था एकोप्याचे प्रतीक बनली आहे. गटबाजी किंवा विरोधाला थारा न देता केवळ आपसी चर्चा आणि सहमतीने पदाधिकारी निवडण्याची ही आदर्श पद्धत संपूर्ण कोकणात चर्चेचा विषय ठरली आहे. नवीन तरुण नेतृत्वाच्या निवडीमुळे संस्थेच्या प्रगतीला अधिक वेग मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात असून सर्व स्तरांतून नवनियुक्त पदाधिकाऱ्यांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Total Visitor Counter

3369483
Share This Article