GRAMIN SEARCH BANNER

राजापुरात दुचाकी अपघातातील जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

Gramin Varta
217 Views

राजापूर : तालुक्यातील सागवे–देवगड मार्गावरील घोडेपोई येथील तीव्र उतारावर झालेल्या दुचाकी अपघातात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. प्रदीप शिवप्रसाद (23, मूळ रा. उत्तर प्रदेश, सध्या रा. नाणार, ता. राजापूर) असे मृत तरुणाचे नाव आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 16 डिसेंबर रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास प्रदीप हा दुचाकीवरून चिकन आणण्यासाठी कात्रादेवी–सागवे परिसरात गेला होता. त्यावेळी गणेश रमेश घाडी (38, रा. तिर्लोट, भाकरवाडी, ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग) याने प्रदीपला आंबेरी येथे घरी सोडण्याची विनंती केली. त्यानुसार प्रदीपने गणेश घाडीला दुचाकीवर डबल सीट बसवून आंबेरीकडे निघाला.

घोडेपोई येथील तीव्र उतारावर दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाला. या अपघातात प्रदीप आणि गणेश घाडी दोघेही जखमी झाले. प्रदीपला गंभीर दुखापत झाल्याने त्याला सिंधुदुर्ग–ओरोस येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असताना 18 डिसेंबर रोजी त्याचा मृत्यू झाला.
या प्रकरणी प्रदीपच्या निष्काळजी वाहनचालना मुळे स्वतःचा मृत्यू व गणेश घाडी यांना दुखापत झाल्याप्रकरणी 1 जानेवारी रोजी राजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे

Total Visitor Counter

3376166
Share This Article