GRAMIN SEARCH BANNER

संगमेश्वर : निढळेवाडीची सहा वर्षांची श्रीशा पिंपरकर राष्ट्रीय स्तरावर चमकली, नॅशनल चिन्मय गीता फेस्ट स्पर्धेत तृतीय क्रमांक

Gramin Varta
67 Views

संगमेश्वर : तालुक्यातील निढळेवाडी या छोट्याशा गावातील केवळ सहा वर्षांची श्रीशा अनुप पिंपरकर हिने गीता पठणाच्या लौकिकात आपला ठसा उमटवत सर्वांचे लक्ष वेधले आहे. नॅशनल चिन्मय गीता फेस्ट 2025 या प्रतिष्ठित स्पर्धेत तिने देशभरातून आलेल्या स्पर्धकांत बाजी मारत राष्ट्रीय स्तरावर तिसरा क्रमांक पटकावला.

पुण्यात झालेल्या चिन्मय मिशन मुंबई आयोजित ‘श्रीमद्भगवद्गीता अध्याय १५ – पुरुषोत्तम योग’ या राज्यस्तरीय स्पर्धेत द्वितीय क्रमांकाची कमाई करून श्रीशाने आधीच आपल्या प्रतिभेची ताकद दाखवली होती. त्याच यशाच्या जोरावर तिची राष्ट्रीय फेरीसाठी निवड झाली आणि 29 नोव्हेंबर 2025 रोजी झालेल्या अंतिम स्पर्धेत तिने पुन्हा आपली चमक सिद्ध केली.

लहान वयात गीतेचे पठण, अर्थ आणि भावार्थ आत्मसात करून मिळवलेले हे यश गावभर अभिमानाने साजरे केले जात आहे. श्रीशावर शुभेच्छांचा वर्षाव होत असून पालक, शिक्षक आणि स्थानिक नागरिकांनी तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी आशिर्वाद व्यक्त केले आहेत.

Total Visitor Counter

3366904
Share This Article