GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरी : आठवडा बाजार परिसरात ब्राउन हेरॉईनसह तिघांना अटक

Gramin Varta
467 Views

रत्नागिरी :शहरातील आठवडा बाजार परिसरात ब्राउन हेरॉईन बाळगणाऱ्या तिघा संशयितांविरोधात रत्नागिरी शहर पोलिसांनी कारवाई करत एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई २ जानेवारी रोजी सायंकाळी सुमारे ७.४० वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.

अजय ऊर्फ पप्पू प्रभाकर नाचणकर (वय ४६, रा. तेली आळी, रत्नागिरी), मुनाफ नरुद्दीन वस्ता (वय ३७, रा. राजीवडा, रत्नागिरी) आणि अरसलान सिकंदर फणसोपकर (वय २५, रा. राजीवडा, रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.

शहरातील आठवडा बाजार परिसरात अमली पदार्थांची तस्करी होणार असल्याची गोपनीय माहिती शहर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी संबंधित ठिकाणी सापळा रचला. दरम्यान दुचाकीवरून आलेले तीन इसम संशयास्पद हालचाली करत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

पोलिसांनी तिघांनाही ताब्यात घेऊन अंगझडती घेतली असता त्यांच्या जवळून सुमारे ३ ग्रॅम ब्राउन हेरॉईन हा अमली पदार्थ तसेच एक दुचाकी हस्तगत करण्यात आली. या प्रकरणी तिन्ही संशयितांविरोधात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास रत्नागिरी शहर पोलीस करत आहेत.

Total Visitor Counter

3198800
Share This Article