GRAMIN SEARCH BANNER

खेंड बडदेवाडीत घराच्या छपरावर दरड कोसळली

Gramin Varta
123 Views

नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांची तातडीने पाहणी

चिपळूण | प्रतिनिधी:  शहरातील खेंड बडदेवाडी परिसरात बुधवारी सकाळी एका घराच्या छपरावर दरड कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

घटनेनंतर संबंधित कुटुंबीयांनी माजी नगरसेवक आशिष खातू यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी तातडीने ही बाब नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांच्या निदर्शनास आणून दिली.
माहिती मिळताच नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देत पाहणी केली व कुटुंबीयांशी संवाद साधला. यावेळी संबंधित कुटुंबीयांनी या ठिकाणी संरक्षक भिंत बांधण्याची तातडीची मागणी केली.

कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, घराच्या वरच्या बाजूला डोंगरातून चिपळूण नगर परिषदेची मोठी पाण्याची पाइपलाइन गेलेली आहे. या लाईनमधून वारंवार लिकेज होत असल्याने माती सैल होऊन दगड कोसळण्याचे प्रकार घडत असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे भविष्यात मोठा धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती व्यक्त करण्यात आली.

या समस्येची दखल घेत नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी परिस्थिती गंभीर असल्याचे मान्य करत योग्य ती कार्यवाही करण्यात येईल व आवश्यक उपाययोजना केल्या जातील, अशी ग्वाही कुटुंबीयांना दिली.
या वेळी माजी नगरसेवक आशिष खातू, शिवसेना उपशहर प्रमुख सुयोग चव्हाण आदी उपस्थित होते.

Total Visitor Counter

3199272
Share This Article