GRAMIN SEARCH BANNER

लांजात घरात घुसून सोन्याची चेन लांबवली; संशयितावर गुन्हा

Gramin Varta
6 Views

लांजा: तालुक्यातील रुण, पराडकरवाडी येथे एका घरातून तब्बल ४५ हजार रुपये किमतीची सोन्याची साखळी चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे, ही चोरी ५ जुलै ते २४ जुलै २०२५ या कालावधीत झाली असून, चोरीचा संशय घरातीलच एका व्यक्तीवर व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात संशयित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रणय संजय पराडकर (वय २५) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. प्रणय पराडकर यांच्या घरातील मुख्य दरवाजाचे कुलूप चावीने उघडून घरात प्रवेश करण्यात आला. त्यानंतर कपाटातील लॉकरची चावी वापरून त्यात ठेवलेली, ‘लक्ष्मी अलंकार ज्वेलर्स’च्या खोक्यात असलेली ५ ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी चोरून नेण्यात आली. या साखळीची किंमत ४५,००० रुपये आहे.

या प्रकरणात पोलिसांनी ऋषिकेश अंकुश पराडकर (वय अंदाजे २७) याच्यावर संशय व्यक्त केला आहे. ऋषिकेश हाही रुण, पराडकरवाडी येथेच राहणारा असून, त्याच्यावर चोरीचा आरोप आहे. फिर्यादीच्या संमतीशिवाय ही चोरी करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून, लांजा पोलिसांनी भारतीय दंड संहिता कायद्याच्या कलम ३०५ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Total Visitor Counter

2649047
Share This Article