GRAMIN SEARCH BANNER

राजापुरातील मारुती मंदिर जलतरण तलाव सात वर्षांनी सुरू

राजापूर: राजापूरच्या भटाळीतील मारुती मंदिरालगत असलेले तळे यंदा श्रमदानातून साफसफाई करण्यात आल्यानंतर जलतरणपटू तसेच नव्याने जलतरणाचे प्रशिक्षण घेणाऱ्यांसाठी खुले करण्यात आले आहे.

या तलावात राजापूर हायस्कूलचे सेवानिवृत्त दिवंगत शिक्षक ए. जी. भावे यांनी अनेक जलतरणपटूंना प्रशिक्षण दिले आहे. त्यांच्या अनेक विद्यार्थ्यांनी यापूर्वी राज्य पातळीपर्यंत स्पर्धांमध्ये यश मिळविले आहे. भावे यांच्या निधनानंतर हे तळे विनावापर पडून होते. दरम्यान यावर्षी कै. भावे यांच्या माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन समर्थनगर जलतरण क्लबची स्थापना केली असून या क्लबच्या माध्यमातून या तलावाची स्वच्छता करण्यात आली आहे.

सन २०१८ पासून बंद असलेला हा तलाव आता जलतरणपटूंसाठी खुला करण्यात आला आहे. या तलावामध्ये कै. भावे यांचे माजी विद्यार्थी जलतरणाचे प्रशिक्षण देणार आहेत. तलावाची साफसफाई करताना निकेत कुडाळी, नीलेश कुडाळी, निनाद शिर्सेकर, दीपक कोदवलकर, युवराज माने, सौरभ कोळवणकर, उदय खडपे, देवेंद्र शेट्ये, सचिन रावण, उल्हास खडपे आदी उपस्थित होते.

Total Visitor Counter

2474941
Share This Article