GRAMIN SEARCH BANNER

लोटे एमआयडीसीतील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था

Gramin Varta
33 Views

खेड : तालुक्यातील लोटे एमआयडीसीमधील अंतर्गत रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून मोठ मोठ्या खड्ड्यांमुळे वाहन चालक आणि कामगारवर्गाला आपला जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.

महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाकडून दुर्लक्ष होत असल्यामुळेच रस्त्यांची ही दुरावस्था झाली आहे असा आरोप येथील उद्योजकांकडून केला जात आहे. लोटे परशुराम औद्योगिक वसाहत एक नामांकित आणि मोठी औद्योगिक वसाहत असून शासनाला कराच्या स्वरूपात येथून मोठा निधी मिळत आहे. तरीसुद्धा औद्योगिक विकास महामंडळ येथील कारखानदारांना पायाभूत सुविधा देण्यास कमी पडत असल्याचे दिसत आहे. परिणामी येथील कारखान्यांमध्ये कच्च्या आणि पक्क्या मालाची ने आण करणाऱ्या वाहनांना,

पंचक्रोशीतील स्कूल बसेस ना तसेच शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी वर्ग, एमआयडीसीतील कामगार वर्ग यांनाही याच रस्त्यावरून जीव मुठीत घेऊन कसरत करावी लागत आहे.

आणि गेली पाच ते सहा वर्ष या रस्त्याची अशी दुरावस्था होत असून सुद्धा एमआयडीसी चे अधिकारी याकडे डोळेझाक करत आहेत असा आरोप पंचक्रोशीतून कारखानदारांकडून केला जात आहे. या औद्योगिक वसाहतीमधून शासनाला कराच्या स्वरूपात कोट्यावधींचा महसूल मिळतो तरीही एमआयडीसी या कारखानदारांना पायाभूत सुविधा देण्याकडे दुर्लक्ष का करते? असा सवाल कारखानदार आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थ करत आहेत. जर या रस्त्याची लवकरात लवकर दुरुस्ती केली नाही तर येथे आंदोलन करून रस्ता बंद करण्याचा इशारा येथील स्थानिक ग्रामस्थांनी दिला आहे.

Total Visitor Counter

3374175
Share This Article