GRAMIN SEARCH BANNER

खेड : शिवीगाळ करून रॉडने मारहाण केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा

Gramin Varta
136 Views

खेड : तालुक्यातील वेरळ येथे शिवीगाळ करत लोखंडी रॉडने पायावर व हातावर मारहाण करून दुखापत केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुभम संतोष जाधव (२७, रा. भरणे) आणि ऋत्विक उत्तम चव्हाण (२३, रा. सवेणी–कातळमाळ) अशी आरोपींची नावे आहेत.

याप्रकरणी सोहम किशोर मयेकर (२६, रा. दापोली–चिपळूण) यांनी खेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, सोहम मयेकर यांनी आपली गाडी सर्व्हिस रोडवर उभी करून तपासणी करत असताना वरील दोघांनी त्यांना शिवीगाळ केली. त्यानंतर लोखंडी रॉडने पायावर व हातावर मारहाण करून जखमी केले, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Total Visitor Counter

3369254
Share This Article