खेड : तालुक्यातील शेरवली गावचे रहिवासी हनुमंत म्हादू नायनाक (वय ७१) यांचे मुंबईतील सायन रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. दीर्घकाळापासून ते मूत्रपिंड व लघवीच्या आजारांनी त्रस्त होते. उपचारासाठी दाखल झाल्यानंतर १ जुलै रोजी सकाळी ६ वाजता त्यांना मृत घोषित करण्यात आले.
गेल्या २-३ महिन्यांपासून नायनाक यांना लघवीचा त्रास आणि मूत्रपिंडासंबंधी गंभीर समस्या जाणवत होत्या. यासाठी त्यांनी खाजगी दवाखान्यांमध्ये उपचार घेतले. मात्र, प्रकृती खालावत गेल्याने १९ जून २०२५ रोजी त्यांना तातडीने मुंबईतील सायन रुग्णालयात भरती करण्यात आले.
सायन रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक ३६ मध्ये त्यांना दुपारी ३.३३ वाजता दाखल करून त्याच दिवशी शस्त्रक्रिया करण्यात आली. उपचार सुरू असतानाच १ जुलै रोजी पहाटे साडेपाच ते सहा वाजण्याच्या सुमारास डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.
येथील पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मूत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त वृद्धाचा मुंबईत उपचारादरम्यान मृत्यू
