GRAMIN SEARCH BANNER

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील बहूचर्चीत उड्डाणपुलावर अखेर पडला पहिला स्लॅब

चिपळूण (प्रतिनिधी) : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील बहूचर्चीत ठरलेल्या उड्डाणपुलावर अखेर सोमवारी पहिला स्लॅब टाकण्यात आला. या उड्डाणपुलावरील पिलरची संख्या वाढल्याने दोन्ही लेन मिळून १८२ स्लॅब टाकण्यात येणार आहेत. २२० एमएम जाडीचा हा स्लॅब आहे. भर पावसाळ्यातही शरटरिंग आणि स्लॅबचे काम सुरू ठेवले जाणार आहे. शहरातील महामार्गावरील उड्डाणपुलाचे काम गेल्या काही वर्षापासून रखडले आहे. उड्डाणपुलाचे काम सुरू असताना बहदूरशेखनाका येथे तो कोसळल्यानंतर पुलाच्या रचनेत बदल करण्यात आला.

उड्डाणपुलाच्या पिलरची संख्या दुप्पट करण्यात आली. तर पहिले तयार केलेले गर्डर नष्ठ करून नव्याने गर्डर निर्माण करण्यात आले. गेल्या काही महिन्यापासून पिलरवर पिअर कॅप उभारणीचे काम सुरू होते. दोन्ही बाजूकडून पुलाचे काम केले जात आहे. मेहता पेट्रोल पंपाजवळून उड्डाणपुलावर शटरिंगचे काम पुर्णत्वास गेल्यानंतर सोमवारी स्लॅब टाकण्याच्या कामाला सुरवात झाली. जाणाऱ्या आणि येणाऱ्या अशा दोन्ही बाजूस स्वतंत्रपणे स्लॅब टाकण्यात येत आहे. त्यामुळे १८४० मिटर लांबीच्या या उड्डाणपुलावर एकूण १८२ स्लॅब टाकले जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात पुलाच्या पिलरच्या मध्ये ४० मिटरचे अंतर होते. मात्र नव्या रचनेत २० मिटर अंतरावर पिलर टाकल्याने त्याची संख्या वाढली. भर पावसाळ्यात या उड्डाणपुलाचे काम सुरू राहणार आहे. १८४० मिटर लांबीचा हा पुल मार्गी लागल्यानंतर यावरील वाहतूक सुरू झाल्यावर डांबरी कोट टाकला जाणार आहे. आणखी ८ ते १० महिने पुलाचे काम सुरू राहण्याची शक्यता आहे.

Total Visitor Counter

2475110
Share This Article