GRAMIN SEARCH BANNER

रॅलिस पॅरामेडिकल इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांचे प्रॅक्टिकल ट्रेनिंग

Gramin Varta
130 Views

राजापूर : रॅलिस पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट, वाटूळ येथील विद्यार्थ्यांसाठी दीनदयाळ रुग्णालय, लांजा येथे एक दिवसीय प्रॅक्टिकल ट्रेनिंग उपक्रम आयोजित करण्यात आले होते. या उपक्रमात इन्स्टिट्यूटचे २८ विद्यार्थी सहभागी झाले होते.

ट्रेनिंग प्रसंगी रुग्णालयातील विविध विभागांना भेट देऊन विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष अनुभव घेतला. वैद्यकीय क्षेत्रातील प्रॅक्टिकल ज्ञान कसे आत्मसात करावे, याविषयी रुग्णालयाच्या सर्वेसर्वा डॉ.पूर्वा मुळ्ये यांनी विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. या उपक्रमात विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष रुग्णसेवेचा अनुभव मिळाला. दरम्यान यावेळी रॅलिस पॅरामेडिकल इन्स्टिट्यूटचे शिक्षक मिनाक्षी पाटील व अनिकेत जाधव उपस्थित होते.

Total Visitor Counter

3380005
Share This Article