रत्नागिरी: भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे स्वीय सहायक अनिकेत पटवर्धन यांच्या वाढदिवसानिमित्त येथील उत्कर्ष सेवाभावी संस्थेतर्फे इन्फिगो आयकेअर हॉस्पिटलच्या सौजन्याने शालेय विद्यार्थ्यांची ना मोफत नेत्रतपासणी करण्यात आली.आवश्यक त्यांना मोफत चष्मे वाटपही करण्यात आले.
गोदूताई जांभेकर विद्यालयात झालेल्या या कार्यक्रमात कोकण विभागाचे शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होते. विद्यार्थ्यांना आपल्या शरीराच्या महत्त्वाच्या अवयवांपैकी डोळे किती महत्त्वाचे आहेत, ते त्यांनी समजावून सांगितले. विद्यार्थ्यांनी सतत आपल्या आई-वडिलांचा, गुरुजनांचा आदर आणि मानसन्मान केला पाहिजे, चांगल्या व शिस्तबद्ध शिक्षणाने आपली प्रगती साधता येते, मोबाइल आणि सोशल मीडियाचा वापर टाळला पाहिजे असे त्यांनी सांगितले.
उत्कर्ष सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष सुहास (राजू) भाटलेकर यांनी यावेळी सांगितले की, अत्यंत समाजोपयोगी उपक्रम राबवीत असून संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये हा उपक्रम राबविणार असून सर्व शालेय विद्यार्थ्यांना मोफत चष्मे वाटप करणार आहोत.
रत्नागिरी : अनिकेत पटवर्धन यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी




