जाकादेवी /वार्ताहर :-रत्नागिरी तालुक्यातील निवळी जयगड १६४ मुख रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेले मोठमोठे धोकादायक खड्डे लवकरात लवकर बुजवण्यात यावेत, अशी तक्रार पीडब्ल्यूओडी रत्नागिरी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे जाकादेवी येथील युवा नेते भाजपा तालुकाध्यक्ष प्रतिक देसाई आणि भाजपा तालुका कार्यकारिणी सदस्य ऋषिकेश उर्फ बंटी सुर्वे यांनी तक्रार केली होती.
या तक्रारीची दखल घेत उपविभागीय अधिकारी कार्यालय, रत्नागिरी सार्वजनिक बांधकाम उपविभाग यांच्याकडून तातडीने दखल घेत निवळी ते जयगड हायवे १६४ या मुख्य रस्त्यावरील ठिकठिकाणी पडलेले अपघाताला कारणीभूत ठरणारे धोकादायक खड्डे बुजवण्याचे काम सुरू झाले आहे.ऐन गणपतीच्या पार्श्वभूमीवर निवळी ते जयगड रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम प्रशासनाने सुरू केल्याने प्रवासी व वाहन चालकांनी समाधान व्यक्त केले आहे .सध्या डबर टाकून हे खड्डे बुजवले जात आहेत.
पाऊस कमी झाल्यानंतर बुजवलेल्या खड्ड्यांवर डांबर टाकून खड्डे पक्या स्वरूपात बुजवण्यात येणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते व युवा कार्यकर्ते ऋषिकेश उर्फ बंटी सुर्वे यांनी सांगितले आहे. जाकादेवी खालगाव पंचक्रोशी असो किंवा निवळी ते जयगड परिसरात कोणतीही अपघातजन्य किंवा नैसर्गिक परिस्थिती उद्भवल्यास युवा नेते प्रतिक देसाई आणि बंटी सुर्वे यांची टीम सातत्याने धावत जाऊन तात्काळ मदत पुरविणे, अथवा समस्या दूर करण्यात या कार्यकर्त्यांची भूमिका उल्लेखनी ठरलेली आहे.