GRAMIN SEARCH BANNER

गौरव खन्ना ठरला बिग बॉस 19 चा विजेता, फरहाना भट्ट ठरली रनरअप

Gramin Varta
94 Views

मुंबई: छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध शो बिग बॉस सीझन 19 चा ग्रँड फिनाले नुकताच पार पडला. यंदाच्या सीझनचा विजेतेपद गौरव खन्ना याला मिळालं आहे. गौरव खन्नाला बिग बॉस 19 च्या विजेत्या ट्रॉफीसह लाखोंचं बक्षीस मिळालं आहे.

7 डिसेंबर रोजी या सीझनचा ग्रँड फिनाले मोठ्या धुमधडाक्यात पार पडला.

गौरव खन्ना, तान्या मित्तल, प्रणित मोरे, अमाल मलिक आणि फरहाना भट्ट या स्पर्धकांचा top 5 मध्ये समावेश आहे. बिग बॉसच्या 18 च्या सीझनमध्ये करणवीर मेहरा हा विजेता ठरला होता. दरम्यान यंदाच्या सीझनमध्ये गौरव खन्ना आणि फरहाना भट्टा हे दोन टॉप फायनलिस्ट ठरले. परंतु अखेर गौरव खन्ना विजयाचा मानकरी ठरला. सलमान खानने त्यांच्या दबंग स्टाईलने गौरव खन्नाला ट्रॉफी दिली.

यंदाच्या सीझनमध्ये विजेत्याला 50 लाख रुपयांचं बक्षीस आणि बिग बॉसची ट्राफी मिळाली आहे. यंदाच्या सीझन तीन फायनलिस्ट गौरव खन्ना, प्रणित मोरे, आणि फरहाना भट्ट होते. त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत कोण विजेता ठरेल याची उत्सुकता होती. अखेर गौरव खन्नाने बिग बॉसच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं.

Total Visitor Counter

3369317
Share This Article