रत्नागिरी : युनेस्कोने छत्रपती शिवाजी महाराजांच्या बारा दुर्गांना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिल्यानंतर, या दुर्गांना जनसामान्यातून अभूतपूर्व मानवंदना देण्यासाठी जि.प. शाळा पूर्णगड क्रमांक १ (ता. जि. रत्नागिरी) येथे दुर्गोत्सव उपक्रम उत्साहात राबविण्यात आला.
या उपक्रमांतर्गत विद्यार्थी आणि पालकांनी मातीपासून आकर्षक दुर्गांचे मॉडेल तयार केले. तयार केलेल्या दुर्गांचे सेल्फी शासनाने दिलेल्या लिंकवर अपलोड करून प्रमाणपत्रे प्राप्त करण्यात आली. शाळेच्या या सहभागातून दुर्गसंवर्धनाबद्दल जागरूकता निर्माण करण्यास हातभार लागला.
उपक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी मुख्याध्यापिका सौ. भारती तायशेटे, तसेच शिक्षक सौ. पूर्वा वाकडे, सौ. भारती शिंगाडे आणि श्री. राजेंद्र रांगणकर यांचे मार्गदर्शन लाभले. या उपक्रमाला शाळा व्यवस्थापन समिती, पालक आणि विद्यार्थ्यांचे उत्स्फूर्त सहकार्य मिळाले.
शाळेने घेतलेल्या या स्तुत्य उपक्रमाचे केंद्रप्रमुख श्री. राणे सर आणि शिक्षण विस्तार अधिकारी (बीट पावस) हिरवे मॅडम यांनी समाधान व्यक्त करत शाळेच्या उपक्रमशीलतेचे कौतुक केले.
जि.प. शाळा पूर्णगड नं.१ मध्ये दुर्गोत्सव उपक्रम उत्साहात संपन्न







