संगमेश्वर: संगमेश्वर तालुक्यातील रांगव गावातील जिल्हा परिषद आदर्श शाळा रांगव येथील विद्यार्थ्यांना ‘लेट्स हेल्प स्माईल फाउंडेशन’ या मुंबईस्थित संस्थेने शालेय उपयुक्त वस्तूंचे वाटप केले. श्री. रुपेश थोरावशे यांच्या मागणीनुसार संस्थेने यंदा या शाळेला मदतीचा हात दिला.
‘लेट्स हेल्प स्माईल फाउंडेशन’ ही संस्था विविध गावातील शाळांना शालेय वस्तूंच्या स्वरूपात मदत करत असते. या संस्थेचे संस्थापक श्री. राकेश हरिश्चंद्र परब, श्री. विकास दत्तात्रय चौधरी आणि अध्यक्ष श्री. हनुमंत दुर्गादास गडकरी यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला.
वस्तू वाटपाच्या वेळी गवळीवाडी येथील ग्रामस्थांच्या वतीने विद्यार्थ्यांना वस्तू वितरित करण्यात आल्या. याप्रसंगी श्री. सीताराम चिले, श्री. शिवराम चिले, श्री. वीरेश कुंभार, श्री. सुरेश थोरावशे, श्री. विनोद कांबळे, श्री. नथुराम रांगणेकर यांच्यासह शाळेच्या शिक्षिका सौ. साळुंखे मॅडम, सौ. शिंदे मॅडम, सौ. चाचे मॅडम आणि रांगव गावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संस्थेच्या या स्तुत्य उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य मिळाले असून, त्यांच्या शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळाले आहे. ‘लेट्स हेल्प स्माईल फाउंडेशन’च्या या कार्याचे रांगव परिसरातून कौतुक होत आहे.