GRAMIN SEARCH BANNER

राजिवडा कर्ला रोडवर ब्राउन शुगर विक्री करणाऱ्या दोघांना अटक

Gramin Varta
9 Views

रत्नागिरी : रत्नागिरी शहर पोलीसांनी राजिवडा ते कर्ला रोडवर अंमली पदार्थ विरोधात मोठी कारवाई करत ब्राउन शुगरसारख्या अंमली पदार्थाच्या विक्रीप्रकरणी दोघांना अटक केली आहे. पोलीस अधीक्षक श्री. नितीन दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, २४/०७/२०२५ रोजी गुप्त माहितीच्या आधारे मुस्तकिन युसुफ मुल्ला आणि मोहमिन नूरमोहम्मद फणसोपकर या दोघांकडून ब्राउन शुगरसदृश अंमली पदार्थाचे १७५ पुडे (एकूण ९०,५०० रुपये किमतीचे) जप्त करण्यात आले. या अंमली पदार्थाची बेकायदेशीर विक्री करत असताना रत्नागिरी शहर पोलीस ठाणे हद्दीत त्यांना अटक करण्यात आली. या प्रकरणी गुन्हा नोंदवून पुढील तपास पोलीस निरीक्षक श्री. अमित देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे.

कारवाईत सहभागी अधिकारी व कर्मचारी :

1. पी.एस.आय/१८८ संजय झगडे
2. पी.एस.आय/५०९ सुशील शिंदे
3. पो.हे.का/४७७ गणेश साळवी
4. पो.ना/२८५ संतोष ठाकूर
5. पो.ना/११४७ अवधूत मोरे
6. पो.ना/१३६२ अनिरुद्ध कदम
7. पो.हे.का/१४१० संदीप कदम
8. पो.हे.का/२६५ संतोष जाधव
9. पो.हे.का/२८८ सलीम काजी
10. चालक पो.ना/२१५ अंकुर कोळी

या यशस्वी कारवाईबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नितीन दळवी यांनी पथकाचे अभिनंदन केले असून, अंमली पदार्थ विक्रेत्यांविरुद्ध अशीच कठोर कारवाई सुरूच राहील, असा इशारा दिला आहे.

Total Visitor Counter

2649236
Share This Article