चिपळूण: पुलामुळे स्थानिक नागरिक, उद्योग आणि MIDCतील उद्योजकांना होणारा त्रास तात्काळ कमी व्हावा यासाठी पर्यायी व्यवस्था करण्याचे निर्देश ना. सामंत ह्यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग, MIDC अधिकारी आणि जिल्हा प्रशासनाला दिले.
ना. सामंत ह्यांनी १५ दिवसांत टेंडर प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले. खेडच्या पुलासाठी वापरलेली जलद बांधकाम तंत्रज्ञान वापरून हा पूलही त्वरित उभारण्याचे निर्देश दिले असून या पुलासाठी लागणारा अंदाजे ३४-३५ कोटी रुपयांचा संपूर्ण निधी MIDC मार्फत देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर मागील छोटा पूलही या योजनेत समाविष्ट करून दोन्ही पुलांची कामे पूर्ण केली जातील. तसेच, MIDC परिसरात रस्त्यांचे रुंदीकरण करून वाहतूक सुरळीत करण्याचे आदेश ना. सामंत ह्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.
पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी केली खडपोली पुलाची पाहणी; 35 कोटींचा निधी जाहीर
