GRAMIN SEARCH BANNER

ब्रेकिंग: मनोज जरांगे यांच्या मागणीला यश; हैदराबाद गॅझेट लागू होणार

Gramin Varta
12 Views

8 पैकी 6 मागण्या मंजूर

मुंबई : मराठा नेते मनोज जरांगे यांच्या उपोषणाला आज मोठा विजय मिळाला आहे. कारण मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीवर सरकारने सकारात्मक पवित्रा घेतली आहे. राज्य सरकारचं शिष्टमंडळ आज मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला गेलं.

मराठा मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि इतर सदस्य या शिष्टमंडळात आहेत. या शिष्टमंडळाने सरकारचा तयार केलेला मसुदा मनोज जरांगे पाटील यांना दाखवला. यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी सर्व आंदोलकांना माहिती दिली. मनोज जरांगे यांची पहिली मागणी ही हैदराबाद गॅझिटियरनुसार अंमलबजावणी करण्याबाबत होती. राज्य सरकराने ही मागणी मान्य केली आहे. तसेच सातारा गॅझिटिरनुसार अंमलबजावणी करण्यास थोडा वेळ लागणार आहे. पण ते लागू करण्याबाबत छत्रपती घराण्याचे वंशज मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी ग्वाही दिली आहे. तसेच मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याबाबतही सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. यावेळी एका मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील यांनी सरकारच्या शिष्टमंडळाला करेक्शन सुचवलं आहे.

“सगळ्यात अगोदर राज्य मंत्रिमंडळाचे मराठा उपसितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील आणि सर्व सदस्य यांचे सर्वांचे मन:पूर्वक कौतक करतो आणि स्वागत करतो. या अंतर्गत येणाऱ्या विषयाचे सचिव सुद्धा प्रत्यक्ष हजर आहेत. त्यांचे देखील मनापासून कौतुक आणि आभार. सगळे अधिकाऱ्यांचं मनापासून कौतुक. विषय शांततेनं समजून घेण्याची आवश्यकता आहे. आपलं म्हणणं होतं ते आपण लेखी स्वरुपात सरकारला निवेदनातून सादर केलं आहे. सरकारचं शिष्टमंडळ हे प्रत पुन्हा एकदा तुमच्या हातात दिली जाईल. तुम्हाला ते मान्य असेल तर तासाभरात सरकार जीआर काढणार आहे”, अशी माहिती मनोज जरांगे पाटील यांनी सुरुवातीला दिली.

“विषय क्रमांक 1 आपण मागणी केली होती की, हैदराबाद गॅझेटियरची तात्काळ अंमलबजावणी करावी. त्यावर सरकारने लेखी मागणी मान्य केली आहे”, अशी महत्त्वाची माहिती मनोज जरांगे यांनी दिली.

सरकारकडून काय-काय मागण्या मान्य?

1) हैदराबाद गॅझिटियरची अंमलबजावणी सरकार तातडीने सुरु करणार

2) सातार गॅझिटियरची अंमलबजावणी लवकरच सुरु करणार. अंमलबजावी लागू करण्यासाठी मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी हमी घेतली. (सरकारने 1 महिन्याचा वेळ मागवला. विखे पाटील आणि शिवेंद्रराजे भोसले यांनी हमी दिली)

3) मराठा आंदोलकांवर सर्व गुन्हे मागे घेणार. त्याचाही जीआर काढला जाणार

Total Visitor Counter

2650279
Share This Article