स्पर्धेत दिप्ती गोताड सर्वप्रथम
जाकादेवी /संतोष पवार : रत्नागिरी तालुक्यातील प्राथमिक केंद्रशाळा ओरी नं १ येथे रानभाज्या प्रदर्शन व पाक कलाकृती स्पर्धा यशस्वीरीत्या संपन्न झाल्या.
या प्रदर्शनाला ग्रामस्थांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला या शाळेतील विद्यार्थ्याच्या पालकांमार्फत रानभाज्या प्रदर्शन व पाककला कृती स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये टाकळा,अळू ,फोडशी, केळफूल ,सुरण, कुडा यांसारख्या अनेक प्रकारांचा समावेश होता. यामध्ये सुमारे १५ पालकांचा समावेश होता.
हे प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्याक श्री धनंजय आंबवकर शाळा व्यवस्थापन समितिचे अध्यक्ष श्री. संकेत उर्फ बंड्या देसाई यांनी प्रयत्न केले. त्याचप्रमाणे या पाक कृतीचे परीक्षण करण्यासाठी चाफे कॉलेजचे प्राध्यापक श्री. जितेंद्र बोंबले व सौ. संस्कृती पाचकुडे यांचे मोलांचे सहकार्य लाभले.
तसेच या पाककृती स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकावला सौ. दिप्ती दिपक गोताड द्वितीय क्रमांक सौ. मनाली मोहित देसाई तर तृतीय क्रमांक सौ. मुग्धा गौरव देसाई यांनी संपादन केला.त्याचप्रमाणे सौ प्रमिला शशिकांत देसाई व सौ. दीक्षा चंद्रकांत गोताड यांना उत्तेजनार्थ स्पर्धेक म्हणून घोषित करण्यात आले .यशस्वी स्पर्धकांचे शाळेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.
या कार्यक्रमांसाठी गावच्या सरपंच सौ. स्वाती उदय देसाई,शाळेतील मुख्याध्यापक धनंजय आंबवकर,पदवीधर शिक्षिका सौ.समिक्षा पवार, सहाय्यक शिक्षक गणपती पडुले, रामदास चव्हाण, बँक ऑफ इंडिया जाकादेवी येथील अधिकारी,अंगणवाडी सेविका सौ.देसाई, ग्रामस्थ व पालक उपस्थित होते.