GRAMIN SEARCH BANNER

हातखंबा येथे ट्रकच्या धडकेत गाय, बैलाचा मृत्यू; चालकावर गुन्हा दाखल

Gramin Varta
280 Views

रत्नागिरी : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर हातखंबा गावाजवळ एका बेदरकारपणे चालवलेल्या आयशर ट्रकने धडक दिल्याने एक गाय आणि एका बैलाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. हा अपघात १६ सप्टेंबर रोजी रात्री ११.३० वाजताच्या सुमारास हातखंबा येथील ईश्वर ढाब्यासमोर घडला. याप्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संकेत जयवंत देसाई (वय ३२, रा. हातखंबा) यांनी यासंदर्भात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. फिर्यादीनुसार, मुंबईहून गोव्याकडे जाणाऱ्या आयशर ट्रक (क्र. एमएच ०१ ईई ३९६९) वरील चालक मुन्ना चेदीराम प्रसाद (वय ५०, रा. उत्तर प्रदेश) याने अत्यंत निष्काळजीपणे व धोकादायक पद्धतीने वाहन चालवले.
या निष्काळजीपणामुळे रस्त्यावरून जात असलेल्या एका पांढऱ्या रंगाच्या ५ वर्षांच्या बैलाला आणि १० वर्षांच्या गायीला ट्रकने जोरदार धडक दिली. या धडकेत दोन्ही जनावरांचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.

Total Visitor Counter

3200134
Share This Article