रत्नागिरी:- भगवती किल्याजवळील सनसेट पॉईंटवरून महिला खाली पडल्याने एकच खळबळ उडाली. फोटो काढत असताना रेलिंगच्या बाहेर गेल्याने तिचा तोल जाऊन ती खाली पडल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून पावसाळ्याचे दिवस असल्याने जिथे धोकादायक सूचना आहे तिथे कोणी जाऊ नये असे प्रशासन वारंवार सांगत असताना सुद्धा सेल्फीच्या नादात हा प्रकार घडल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले असून बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.