रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील काळबादेवी बंदर परिसरात एका तरुणाचा समुद्रात बुडून बेपत्ता होण्याचा प्रकार 7 ऑगस्ट रोजी घडला. गजानन महादेव पेडणेकर (वय ३०, रा. नेवरे, ता. रत्नागिरी) असे बेपत्ता झालेल्या तरुणाचे नाव आहे.
प्राथमिक माहितीनुसार, गजानन पेडणेकर हे काळबादेवी बंदरावर पिराजवळ उभ्या असलेल्या एका बोटीवर होते. दरम्यान, अचानक ते पाण्यात पडले आणि तेव्हापासून त्यांचा काहीही थांगपत्ता लागलेला नाही. या प्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात अधिकृत नोंद करण्यात आली आहे.
घटनेनंतर पोलिसांनी तातडीने स्थानिक मच्छीमार व ग्रामस्थांच्या मदतीने शोधमोहीम सुरू केली असून, सध्या बुडालेल्या तरुणाचा शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
रत्नागिरी : काळबादेवी येथे समुद्रात बुडून तरुण बेपत्ता
