संदीप घाग / सावर्डे
शासनाच्या कृषी विभागाच्या विविध योजना रत्नागिरी जिल्ह्यात प्रभावीपणे राबवण्यात येणार असून त्या प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, अशी माहिती विभागीय कृषी सहसंचालक (कोकण विभाग, ठाणे) श्री. शिवाजी आमले यांनी दिली.
कृषी योजना कोकणात प्रभावीपणे राबविण्यासाठी आमदार शेखर निकम यांच्या पुढाकाराने सह्याद्री शिक्षण संस्थेच्या दालनात कृषी विभागाच्या योजनांबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत विविध योजनांची माहिती माने व त्यांच्या सहकाऱ्यांनी दिली. शेतकऱ्यांना योजनांचा अधिकाधिक लाभ मिळावा यासाठी कृषी अधिकाऱ्यांनी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी आमदार शेखर गोविंदराव निकम यांच्या हस्ते विभागीय कृषी सहसंचालक श्री. शिवाजी आमले यांचा सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर जिल्हा कृषी अधिकारी, तसेच उपविभागीय कृषी अधिकारी श्री. शिंदे यांचेही स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमास माजी जिल्हा परिषद सदस्य विजय गुजर, दादा साळवी, असुर्डेचे सरपंच पंकज साळवी, सह्याद्री शिक्षण संस्थेचे सचिव महेश महाडिक, ज्येष्ठ नेते दादा साळवी, राष्ट्रवादी काँग्रेस सांस्कृतिक विभागाचे जिल्हा अध्यक्ष देवराज गरगटे, प्राचार्य सुनीलकुमार पाटील, विजय भुवड, माखजन येथील सुशील भाईजे, माजी जि.प. सदस्य दीपक जाधव, कुडप गावचे सरपंच बावा राजेशिर्के तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
शेतकऱ्यांपर्यंत शासनाच्या योजना पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील – विभागीय कृषी सहसंचालक शिवाजी आमले
